।। vak`tuMD mahakaya saUya-kaoiTsamaPa`Ba,,,,,,,: iniva-GnaM ku$ mao dova sava-kayao-Yau sava-da ।।

maMDLacaI maaihtI

समस्य प्रिय बंधु भगिनींनो, यन्दाच्या सत्तराव्या महोत्सवी श्री गणेशोत्सव साजरा करन्यासाठी आपणा सर्वांना निमंत्रण व हार्दिक स्वागत. हा उत्सव गुरुवार भाद्रपद शुक्ल ४ ते रविवार भाद्रपद शुद्ध १४१ शके १९३३ ( १ - ९ - ११ ते ११ - ९ - ११ ) या कालावधीत फार मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे.

आपल्या सर्वांच्या सहकार्याने व प्रोत्साहाने या सत्तराव्या महोत्सवी वर्षी आम्हांला गणाधिपती श्री गनरायाची सेवा करण्याचे सदभाग्य लाभले आहे याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत.

आमचा नानाचौक हा विभाग म्हणजे नामदार नाना शंकरशेठ यांच्या खाजगी मालकी हक्काचा भाग, येथेच भवानी शंकराचे खाजगी मंदिर होते. आज त्या प्रशस्त वाडयाच्या जागी शंकरशेठ मेन्शन ही इमारत उभी आहे. याच प्रशस्त वाड्मयातील काही उत्साही तरुण मंडळींनी म्हणजेच विनायक नार्वेकर, श्री विष्णू कुडाळकर, श्री विनु दामले , श्री मधुकर आजगावकर, कु. मधु वगैरेंनी इराणी चाळीतली मंडळीबरोबर १९४२ साली गणेशमूर्तीची स्थापना केली.

१९६२ मध्ये या तबेल्याच्या जागी डी विभाग महानगरपालिकेचे कार्यालय बांधण्यात आल्यावर परत एकदा गणेशमूर्तीची स्थापना करण्याच्या जागेची चिंता उभी राहीली पण साक्षात चिंतामणीला चिंता कशी असणार? सर्व गणेशभक्त त्यावेळेच्या पालिका आयुक्तांना भेटले. आयुक्तांनी कार्यालयाच्या आवारातील जागेत गणेशोत्सवासाठी मंजुरी दिली. त्याच जोबनपुत्रा कंपाऊंडमध्ये आमच्या नाना चौक श्री गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तीची कायम स्वरुपात स्थापना झाली.

१९८० नंतरच्या काळात कार्यकारी मंडळात नवचैतन्याने भरलेली काही उत्साही तरुण भाग घेऊ लागले. शंकरशेठ भुवन, शंकरशेठ चाळ, इराणी ब्लॉकमधील श्री चंद्रहास कोकाटे, श्री कृष्णदास शेणॉय, श्री सदुमामा सोरप, संजीवा मेंडन या जाणत्या व जेष्ठ सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विलास पाटील, विनोद अर्गेकर, मोहन कांबळे , भाई खांबे , बाळकृष्ण तानवडे , अजित अर्गेकर , राजू व बिपीन काकोडकर , दिलीप दिगोडकर , वासुदेव कंसारा , दिनेश पार्सेकर , निलेश व राजेश बोंगाळे , नितीन नारकर , हरिशचंद्र गिरकर , राजेश देवतवाल , परेश गावडे , विजय जाधव , नंदादीप परब, नारायण आव्हाड , प्रसाद अर्गेकर , रविकांत बावकर , हेमंत शेळके , सुहास धाळगरकर् , राजेश देवतवाल, संजय जाधव , नितीन घुगे, प्रेमचंद रजक , निनाद नारकर , सुनिल शिंदे, राजू नाईक , गणेश मेंडन, राकेश गौतम यांनीसुद्धा हिरीरीने भाग घेतला. आम्हाला अभिमान वाटतो आमचा गणपती नवसाला पावणारा आहे असे बरयाच भाविकांचे म्हणणे आहे. अनेकांनी आमच्याकडे येऊन आपले अनुभव कथन केले आहेत. भाविक मंडळी आपल्या इछा, आकांक्षा व संकल्प पूर्ण झाल्यानंतर नवस फेडण्यास येतात व श्री चरणी नतमस्तक होतात तेव्हा आम्हा मंडळीना त्यांनी दिलेल्या आशिर्वादातच श्री गणेशाचे दर्शन झाल्याचे समाधान वाटते.

अमरत्व दे उत्सवा मोरया,

अमर करी उत्सवा

आपला नम्र

नानाचौकसार्वजनिकश्रीगणेशोत्सवमंडळ